पालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा

Share This

मुंबई । प्रतिनिधी 14 Nov 2017 -
भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे चारकोपमधील वॉर्ड २१ मध्ये येत्या १३ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. शैलजा गिरकर यांच्या जागी त्यांची सून प्रतिभा गिरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणूकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप आमदार भाई गिरकर आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गिरकर परिवाराचे आणि शिवसेनेचे जुने संबंध आहेत. गिरकर कुटुंबीयांचा उमेदवार या पोटनिवडणूक असल्यास शिवसेना या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेत ठाकरे यांनी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्याच्या सत्तेत सहभागी असणा-या शिवसेनेने अनेक मुद्द्यावर भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांसह, भाजपवर नेहमीच टिका केली आहे. याच कारणास्तव या दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या वाॅर्ड क्रमांक २१ च्या पोटनिवडणूकीच्या निमित्ताने या दोन्ही पक्षात दिलजमाई झाली आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक २१ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या पोटनिवणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार नसल्याने भाजपाला आता काहीही अडचण राहिली नसून प्रतिभा गिरकर यांच्या विरोधात काँग्रेसने उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव करणे केवळ सोपस्कार उरला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी होऊन भाजपचा विजय पक्का आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages