निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा - उद्धव ठाकरे

Share This

मुंबई 1 Nov 2017 : 
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातला प्रवेश जवळपास निश्चित झालाय. नारायण राणे यांना मंत्री बनवणे शिवसेनेला मान्य नसल्याने निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी अचानकपणे मध्यावधीचे संकेत दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिलेत. नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा विरोध हा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मध्यावधीचे संकेत दिले आहेत. त्याप्रमाणेच नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची संभाव्य तारीख चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर करून टाकल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. राणेंच्या एनडीए प्रवेशामुळे नाराज असलेल्या शिवसेनेने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत आपला निरोप मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages