अंधेरीत शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बालदिनाचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंधेरीत शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बालदिनाचे आयोजन

Share This

मुंबई । प्रतिनिधी 17 Nov 2017 -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांच्या वतीने शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी 5 वा. लहान मुलांसाठी "बालदिन"कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, आमदार विभाग प्रमुख अॅड.अनिल परब,शैलेष फणसे राजुल पटेल, राजेश शेटटे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर बालदिनाचा कार्यक्रम सातबंगला मॉडेल टॉउन अंधेरीे पश्चिम येथील चाचा नेहरू उद्यानात होणार आहे.

मॉडेल टाउन रेसिडेंट असोसिएशन आणि स्वप्नाक्षय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने या बालदिनानिमित बाल गोपाळांसाठी चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा बक्षीस समारंभ होणार असून यावेळी पारंपरिक नुत्यचा गीतांचा कार्यक्रम, बाळगोपांळासाठी खाऊ वाटप ,फटाक्यांची आतिशबाजी,अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र(बाळा)आंबेरकर यांच्यासह प्रमुख आयोजक संजीव कल्ले .राजेश ढेरे, अशोक मोरे, अनिल राऊत, योगेश गोरे, सचिन नायक, मनोहर नायक, शौकत विराणी, संतोष साटम, सुरेश बंगेरा, उमा ढेरे, ममता गुप्ता, हे अविरत परिश्रम घेत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages