बेस्टद्वारे अल्पोपहाराचे वाटप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टद्वारे अल्पोपहाराचे वाटप

Share This

मुंबई । प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे उपस्थित राहणाऱ्या जनसमुदायास बेस्ट उपक्रमातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा प्रारंभ मंगळवार दिनांक ०५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क मैदान, नाना नानी पार्क व बाल उद्यान दादर, मुंबई येथे बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ, महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र कुमार बागडे यांच्या हस्ते पार पडला. सदर कार्यक्रमप्रसंगी महाव्यवस्थापक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तर बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिप प्रज्वलन केले. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते उपस्थित जनसमुदायास अल्पोपहार याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमप्रसंगी बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages