जे.जे. रुग्णालयातून पाच वर्षांत ३ हजार ८५६ रुग्ण पळाले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जे.जे. रुग्णालयातून पाच वर्षांत ३ हजार ८५६ रुग्ण पळाले

Share This

मुंबई - मुंबईतील सुप्रसिद्ध अश्या सरकारी सर जे.जे. समूह रुग्णालयातून पाच वर्षांत ३ हजार ८५६ रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पळून गेलेल्या सर्व रुग्णांची लेखी तक्रार जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. माहिती अधिकारात २०१३ ते २०१७ मे महिन्याच्या कालावधीत जे. जे. रुग्णालयातून २ हजार ८४१ पुरुष तर १ हजार १५ महिला रुग्ण पळून गेले आहेत. या रुग्णांनी रुग्णालयातून पळून जाताना ‘डिस्चार्ज’ची कोणतीही औपचारिकता पूर्ण केलेली नसल्याचे दिसून आले आहे. उपचार सुरू असतानाच हे रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे हे रुग्ण पळून गेल्याची अधिकृत तक्रार रुग्णालय प्रशासनाने त्या-त्या वेळी पोलिसांत केली आहे. परंतु एकाही रुग्णाचा तपास लागेलला नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages