मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर ५ अधिकारी निलंबित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर ५ अधिकारी निलंबित

Share This
सहाय्यक आयुक्तांची तात्काळ बदली
मुंबई । प्रतिनिधी - 'कमला मिल कंपाऊंड' परिसरात पबला मध्यरात्री आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. या दुर्गघटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांना दिले आहेत; असे निवेदन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज केले. यावेळी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे सकृतदर्शनी आढळून आलेल्या 'जी दक्षिण' विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिश बडगिरे आणि सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी (ADFO) एस. एस. शिंदे या ५ अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची व सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचीही माहिती आयुक्त मेहता यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages