मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाची आवश्यकता नाही - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाची आवश्यकता नाही - महापौर

Share This

मुंबई | प्रतिनिधी - मुंबई शहराची वाढती लोकसंख्या व त्यामुळे महापालिकेच्या सेवासुविधांवर होणारा परिणाम पाहता मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी विधिमंडळ अधिवेशना दरम्यान केली. याचे पडसाद मुंबईत उमटले आहे. मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची आवश्यकता नाही, असे सांगत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिकेच्या त्रिभाजनास विरोध दर्शविला आहे.

मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची वादग्रस्त मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी मंगळवारी नागपूर येथे विधीमंडळ अधिवेशनात केल्याने भाजपा, शिवसेनेने मोठा गदारोळ घातल्याने विधिमंडळाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची आवश्यकता नाही, असे सांगत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिकेच्या त्रिभाजनास विरोध दर्शविला आहे. या घटनेचे पडसाद मुंबईतही उमटले आहेत. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्रकारांनी याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनास विरोध दर्शवला. मुंबईचे म्हणजे महापालिकेचे तीन भाग करणे आवश्यक वाटत नाही.या मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला जनतेने पाचव्यांदा सत्ता हाती दिली आहे.तसेच सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन मुंबईकरांसाठी चांगले काम करीत आहे, असे महापौर यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे, एखाद्या विषयावर लोकप्रतिनिधी म्हणून बोलणे हा त्या आमदारांचा अधिकार आहे ; मात्र त्यावर चर्चा व्हायला पाहिजे.आणि जरी त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला असला तरी त्यावर लगेचच काही निर्णय होत नाही,असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या विभाजनावर विधिमंडळ अधिवेशनात गदारोळ झाल्याने आता त्याचे पडसाद मुंबई महापालिकेच्या आगामी सभेत उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages