वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत १५ दिवसात बैठक घेणार - नगरविकास राज्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत १५ दिवसात बैठक घेणार - नगरविकास राज्यमंत्री

Share This
नागपूर - मुंबई, ठाणे महानगर क्षेत्रातील तसेच राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत येत्या १५ दिवसात सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल. दोन महिन्यामध्ये फेरीवाला धोरण तयार करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील सर्व महापालिकांना वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत निर्देश देण्यात येतील. फेरीवाला धोरण निश्चित करण्यात येणार असून सर्वत्र टाऊन व्हेंडिंग समिती स्थापन केल्या जातील. रेल्वे हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तसेच या विक्रेत्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी, विक्रेत्या संघटना, पालिका आयुक्त, रेल्वे व पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक १५ दिवसात घेण्यात येईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुनिल प्रभू, मंगलप्रभात लोढा यांनी भाग घेतला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages