मुंबईतील समुद्र किनारे दिव्यांनी उजळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील समुद्र किनारे दिव्यांनी उजळणार

Share This

पालिका करणार दोन कोटींचा खर्च -
मुंबई | प्रतिनिधी - पश्चिम उपनगरातील समुद्र किनारे विद्यूत दिव्यांनी लखलखणार आहेत. याकरिता २ कोटी २८ लाख ११ हजार रुपये पालिका कंत्राटदारावर खर्च करणार आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आणला आहे.

मुंबईतील समुद्र किनाऱ्यांच्या अस्वच्छतेबाबत पालिकेवर टीका केली जाते. काही किनाऱ्यांवर दिवाबत्तीची सुविधा नसल्याची बाब स्थानिक रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली होती. यामुळे मनोरी, सात बंगला, सिल्वर आणि अक्सा या गजबजलेल्या समुद्र किनाऱ्यांवर सुशोभित दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. मलाड पश्चिम येथील मनोरी किनाऱ्यावर दिवे लावण्यासाठी ५९ लाख ६२ हजार रुपये, अंधेरी सात बंगला येथे किनाऱ्यावर दिवे लावण्यास ६५ लाख ४४ हजार ९०३ रुपये , मालाड पश्चिमेला ‘सिल्वर’ येथे ५८ लाख ८१ हजार ३५३ रुपये आणि अक्सा किनाऱ्यावर ६४ लाख २२ हजार ९५४ असे एकूण दोन कोटी ४८ लाख रुपये खर्च येणार आहे. या कंत्राटदाराला दिव्यांची उभारणी, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचा, तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रचालन आणि प्रतिबंधात्मक देखभाल ही कामे करावी लागेल, अशी अट घालण्यात आली आहे. पालिकेने या कामांचा प्रस्ताव बुधवार होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला असून याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages