Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रस्ता उदघाटन कार्यक्रमावरून शिवसेना भाजापा भिडले


मुंबई । प्रतिनिधी -
शिवसेना आणि भाजपमधील लढाई आता रस्त्यावर लढली जाऊ लागली आहे. पालिकेच्या कामाचे उदघाटन करण्याचा प्रयत्न करून क्रेडिट घेण्याचे प्रयत्न करणाऱ्या आमदार तमिल सेलवन यांना उदघाटन न करताच हात हलवत परतावे लागेल आहे. स्थानिक नगरसेकवकाच्या प्रयत्नाने रस्त्याचे काम सुरु होणार होते. या कामाचे उदघाटन पालिकेकडून स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत केले जात असतानाच त्याच कामाचे उदघाटन करण्यास आलेल्या भाजपच्या आमदारामुळे सायन प्रतीक्षा नगरमधील वातावरण चांगलेच तापले. यावेळी शिवसेना व भाजपाचे कार्यकर्ते आपसात भिडले.

मिळालेल्या माहितीनुसार सायन-प्रतीक्षा नगर येथील रस्त्याचे काम शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे व मंगेश सातमकर यांच्या प्रयत्नांनी सुरु होणार होते. त्यामुळे ठोंबरे यांच्या नातवाच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार होते. यासाठी शिवसेनेचे मंगेश सातमकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार होते. परंतु, त्याआधीच भाजपाचे आमदार तमिल सेलवन हे पदाधिकाऱ्यांसह तिथे आले. हे काम आपल्या प्रयत्नांनी होत असल्याचे सांगत उदघाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपाच्या या पदाधिकाऱ्यांना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. यावेळी दोन्ही गटांच्या लोकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली. हाणामारी होण्याची परिस्थिती उद्भवली होती. परंतु, पोलिस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामंजस्याने हे प्रकरण हातात घेतले आणि वेगळे वळण लागू दिले नाही आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना तिथून उद्घाटन न करताच जायला लावले. यामुळे पालिकेच्या आणि नगरसेवकाच्या कामाचे क्रेडिट घेण्यास आलेल्या आमदार तामील सेल्वन यां हात हलवत परतावे लागले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom