हुक्का पार्लरविरोधात विधी समिती सभा तहकूब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हुक्का पार्लरविरोधात विधी समिती सभा तहकूब

Share This

मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरातील मोजोस आणी वन अबव्ह या दोन पबला आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र आगीला कारणीभूत असलेल्या हुक्का पार्लर विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने पालिकेच्या विधी समितीत संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासन हुक्का पार्लरविरोधात कारवाई करण्यास कमी पडत असल्याने विधी समितीची बैठक तहकूब करण्यात आली.

कमला मिल दुर्घटनेच्या अहवालात हुक्का पार्लरमुळे आग लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबईत ठिकठिकाणी हुक्का पार्लर सुरु आहेत. हुक्का पार्लर सुरु असले तरी त्याविरोधात पालिकेचे आरोग्य अधिकारी कारवाई का करत नाही असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. कमला मिल सारख्या दुर्घटना रोखण्यासाठी आणि मुंबईकर नागिरकांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाने हुक्का पार्लर विरोधात आयपीसीच्या २८५ कालमान्वये गुन्हा नोंद करण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक अनिश मकवाणी यांनी केली. पालिकेकडे आरोग्य विभाग व अग्निशमन विभाग आहे. या विभागांच्या नियमांचा वापर करून हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर हुक्का पार्लरवर पालिकेच्या अधिनियमाखाली कारवाई करणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केल्याने संतापलेल्या सर्व पक्षीय सदस्यांनी सभा तहकुब करण्याची मागणी केली. सदस्यांच्या मागणीचा आणि संतापात भावनांचा विचार करत विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर यांनी सभा तहकूब केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages