बँका तीन दिवस बंद राहणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बँका तीन दिवस बंद राहणार

Share This

मुंबई - २६ जानेवारीपासून सलग तीन दिवस सुट्टी असल्याने बँकांचे व्यवहार करता येणार नाहीत. यामुळे 
बँकांचे व्यवहार २५ जानेवारीपर्यंत करुन घ्यावे लागणार आहेत. या तीन दिवसात एटीएममध्येही पैशांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी म्हणजेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असणार आहे. त्यानंतर महिन्याचा चौथा शनिवार असल्याने २७ जानेवारीला बँका बंद राहतील तर रविवारीही बँकांना सुट्टी असल्याने २८ जानेवारीला बँका बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने चेक क्लेअर होण्यातही वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेच एटीएममध्येही पैशांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. बँकांमधून कोणाला व्यवहार करायाचा असल्यास २५ जानेवारीपर्यंत करावा, अन्यथा व्यवहार करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages