पालिका रुग्णालयांमध्ये मोफत मोबाईल चार्जिंगची सुविधा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका रुग्णालयांमध्ये मोफत मोबाईल चार्जिंगची सुविधा

Share This
मुंबई - पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत मोबाईल चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. 

बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्यावतीने पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पालिका आयुक्त मेहता बोलत होते. यावेळी पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, पालिका उपायुक्त सुधीर नाईक, वार्ताहर संघाचे अध्यक्ष विष्णू सोनवणे, सरचिटणीस श्रीरंग सुर्वे, उपाध्यक्ष मारुती मोरे, पालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले आदी उपस्थित होते. 

मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. त्याच्या सोबत त्यांचे नातेवाईकही असतात. मात्र रुग्णालयांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी अडचण होत असते. मोबाईल चार्जिंग करताना आढळल्यास रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून मोबाईल जप्त केला जातो, दंडही आकाराला जातो. ही समस्या वार्ताहर संघाने पालिका आयुक्तांकडे मांडली. या सूचनेची दखल घेऊन मोबाईल चार्जिंगची सुविधा लवकरच सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालिका आयुक्त मेहता यांनी दिली.   

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages