Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

इमारतींपासून पाच मीटर अंतरावर वाहनतळाला सभागृहात विरोध


ठरावाची सूचना मागे घेण्याची कॉंग्रेसवर नामूष्की -
मुंबई | प्रतिनिधी - मुंबईत उभारण्यात आलेल्या इमारतींपासून पाच मीटर अंतरावर सोडण्यात आलेल्या जागेवर वाहनतळ उभारावे, अशी मागणी कॉंग्रसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका सभागृहात केली. मात्र भाजपने या सूचनेला तीव्र विरोध केल्याने महापौरांनी ही सूचना चूकीची ठरवली. त्यामुळे सदर ठरावाची सूचना सभागृहाच्या पटलावरून मागे घेण्याची नामुष्की कॉंग्रेसवर ओढवली.

मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनतळाची समस्या जाणवू लागली आहे. वाहनतळाची समस्या सोडविण्यास महापालिका अपयशी ठरत आहे. मुंबईत इमारतींचा विकास होतो आहे. रस्ता रुंदीकरण व इतर तरतूदींकरिता इमारत प्रस्ताव खात्याकडून इमारतींपासून पाच मीटर अंतरावर (सेटबॅक) जागा सोडण्यात येते. ही जागा मोकळी राहत असल्याने त्याचा वापर संबंधित विकासक व रहिवाशी करतात. त्यामुळे अशी जागा पालिकेने ताब्यात घेवून त्यावर वाहनतळ उभारावे, अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे सभागृहात केली. या सुचनेवर भाजपचे गटनेता मनोज कोटक यांनी आक्षेप घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार सेटबॅकवर वाहने उभी करता येत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच हे वाहनतळ कोणासाठी आहे व त्याचा फायदा कोणाला होणार अाहे, याचा खुलासा करावा अशी मागणी केली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सदर सूचना सभागृहाला अमान्य असून कॉंग्रेसला ती मागे घेण्यास भाग पाडले. दरम्यान, विरोधीपक्ष नेत्यांनी सूचना मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे चूकीच्या पध्दतीने सूचना मांडल्याची चर्चा सभागृहात रंगली होती.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom