सिनेविस्टा स्टुडिओच्या आगीत एकाचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सिनेविस्टा स्टुडिओच्या आगीत एकाचा मृत्यू

Share This

मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल, मेमून मेन्शन आगीची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री कांजूरमार्ग येथील सिनेविस्टा स्टुडिओला आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी आगीनंतर स्टुडिओची पाहणी करताना एकाचा मृतदेह भेटला आहे.

२९ डिसेंबरला कमला मिलच्या अंगाची १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ जानेवारीला मेमून मेंशनला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी रात्री कांजूरमार्ग येथील सिनेविस्टा स्टुडिओमध्ये ‘बेपनाह’ या मालिकेचे चित्रिकरण सुरू असताना आग लागली. चित्रीकरण सुरु असताना दीडशे कलाकार आणि तंत्रज्ञ या ठिकाणी उपस्थित होते. अग्निशमन दलाने या आगीवर सहा फायर इंजिन आणि चार वॉटर टँकरच्या सहाय्याने नियंत्रण मिळवले. रविवारी सकाळी अग्निशमन दलाचे कर्मचारी स्टुडिओत जाऊन पाहणी करत असताना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह ऑडिओ असिस्टंट गोपी वर्मा यांचा असल्याचे समजते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages