बेस्टची ४० लाखांची वीजचोरी पकडली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टची ४० लाखांची वीजचोरी पकडली

Share This

मुंबई | प्रतिनिधी - बेस्ट उपक्रमाच्या विदुयत विभागाच्या दक्षता पथकाने अँटॉप हिल येथील गारमेंट कारखान्यांवर धाड टाकून सुमारे ४० लाखांची वीजचोरी पकडली .याप्रकरणी वीज माफियासह ३६ जणांविरुद्ध वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ,त्यापैकी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

अँटॉप हिल येथील भारतीय कमला नगर येथे काही गारमेंट कारखाने आहेत .त्यापैकी काही कारखान्यात वीज माफियाद्वारे अनधिकृतपणे वीज जोडणी दिल्याची माहिती बेस्टच्या विद्युत विभागाच्या दक्षता पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी विदुयत विभागाचे उपव्यवस्थापक आर.जे.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ७ च्या सुमारास तेथील २५ गारमेंट कारखान्यांवर धाड टाकली. यावेळी या कारखान्यात थेट जोडणीची वीज चेंज ओव्हर स्विचद्वारे चोरून वापरत असल्याचे निदर्शनास आले. सबंधितांनी १८८३१५ युनिटची सुमारे ४० लाख,७ हजार ८२४रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बेस्टने वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.याबाबत पोलिसांनी वीज माफियासह ३६ जणांविरुद्ध कलम १३५,१३८,१५०अनवये गुन्हा दाखल करून त्यापैकी १२ जणांना अटक केली.यावेळी तेथील झोपड्यांवरील १२०० मीटरची वायर काढून टाकली,असे बेस्टतर्फे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages