मटण, मासे महागवणारा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मटण, मासे महागवणारा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीला

Share This

मुंबई । प्रतिनिधी - 
मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मंड्यांच्या अनुज्ञापन शुल्क, गाळ्यांचे भाडे यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने सुचवले आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या विधी समितीत मंजूर झाल्यानंतर आता हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर पालिका सभागृहाची मंजुरी मिळाल्यास मुंबईकर नागरिकांना मंड्यांमधून विकल्या जाणाऱ्या वस्तू, मांस, मटण, मासे इत्यादींच्या दरांमध्येही वाढ होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागाच्या शुल्क अनुसूची भाग ३ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. बाजार विभागाच्या मंडयामध्ये वसूल करण्यात येणाऱ्या वार्षिक अनुज्ञापन शुल्कात सन २००० मध्ये सुधारणा करण्यात आली होती. या शुल्का व्यतिरिक्त घाऊक बाजारसंबंधित व बाह्य मांस संबंधित इतर बाबी अंतर्भूत आहेत. २००० नंतर १६ वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत महागाईचा दर वाढलेला आहे. महापालिका मंड्याच्या माध्यमातून नागरिकंना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शुल्क आणि भाडे दरामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने पालिका प्रशासनाने शुल्क व भाडेवाडीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार मंड्यामधील बाजारात कोणतीही वस्तू, मांस, कोंबड्या, व इतर वस्तू विकण्यासाठी, दलालीच्या अनुज्ञापत्रासाठी, अनुज्ञापत्र वारसांच्या नावे हस्तांतरण करण्यासाठीच्या शुल्क दरात दुप्पट वाढ सुचवली आहे. सदर शुल्क दरवाढीचा प्रस्ताव विधी समिती व त्यानंतर पालिका सभागृहात मंजुर झाल्यास त्या नंतर येणाऱ्या महिन्यापासून दर वाढ लागू केली जाणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव विधी समितीत नुकताच मंजूर झाला असून आता स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. विधी समितीत या शुल्क वाढीबाबत कोणतेही बदल सुचवलेले नाहीत. स्थायी समितीतही शुल्क वाढीबाबत कोणतेही बदल न सुचवल्यास मंड्यांमधून विकल्या जाणाऱ्या मांस, कोंबड्या, मासे इत्यादी सर्वच वस्तूंची दरवाढ होणार आहे.

दरवाढ

----                                                                             सध्याचे दर      प्रस्तावित दर
कोणतीही वस्तू विकण्यासाठी                                २००           ४००
गोठवलेले मांस मासळी                                      १५००          ३०००
ताजे मांस मासळी                                             १५००          ३०००
खाजगी बाजारातील मांसाची दुकाने गाळे               १०००          २०००  
खाजगी बाजारातील कोंबड्यांची दुकाने गाळे            ५००          १०००
खाजगी बाजारातील कोंबड्यां ठेवणे                      १०००          २०००
बाहेर गावावरून मांस आयात केल्यास २० किलोला     ५०           १००
मांस, काळीज, रक्त तपासणी शुल्क                       १००          २००
दलालीच्या अनुज्ञापत्रासाठी गाळ्याशिवाय               १५००          ३०००
दलालीच्या अनुज्ञापत्रासाठी गाळ्यासह                   १६००          ३२००

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages