Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अग्निशमन दलासाठी 'अपघात विमा योजना'

मुलांच्या शिक्षणाचा भारही उचलणार -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात आगीच्या घटनांमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी मृत्युमुखी पडले आहेत. मृत्युमुखी पडणाऱ्या जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी मुंबई महापालिकेने 'अपघात विमा योजना' सुरु करण्याची घोषणा केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सन २०१८ - १९ चा अर्थसंकल्प नुकताच सादर केला या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात अग्निशमन दलासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये सातत्याने आगी लागण्याच्या तसेच इतर आपत्कालीन घटना घडत असतात. अशा घटना घडल्यावर सर्वप्रथम मुंबई अग्निशमन दलाला बोलवले जाते. अग्निशमन दलाचे जवान आपल्या जीवाची बाजी लावून त्या आपत्कालीन परिस्थितीशी सामना करत असतात. यात जवान व अधिकारी जखमी आणि मृत्यू होण्याची घटना घडतात. जवानांच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेऊन 'अपघात विमा योजना' सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 'अपघात विमा योजना' योजना राबवताना याचा भर पालिकेवर किंवा अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यावर पडणार नाही. कर्मचाऱ्यांचे ज्या बँकेत वेतन खाते असेल, ती बँक अपघात प्रकरणी ३० लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची जोखीम स्वीकारणार आहे. याव्यतिरिक्त कुटुंबांवर कोणताही आर्थिक भार न देता महापालिका मृत अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या मुलांचा कालबद्ध शैक्षणिक खर्चाचा भार उचलणार आहे.

कमला मिल आगीनंतर अग्नी सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी २४ विभागांमध्ये ३४ 'अग्निशमन पालन कक्ष' सुरु करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी २८ जीप्स खरेदी करण्यात आल्या असून ७० केंद्र अधिकारी व ३५ अग्निशमकांची अतिरिक्त पदे निर्माण केली जाणार आहेत. यासाठी १२ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी केली आहेत आली आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित प्रतिसाद देता यावा म्हणून जीआयएस आणि जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित 'डीस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स मॅनेजमेंट सिस्टीम - दयाळ १०१' ही कार्यप्रणाली अवलंबण्यात येणार आहे. त्यासाठी २६ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे संबंधितांवर जबाबदारी निश्चित करता येणार आहे. कमांड अँड कंट्रोल प्रणाली करीता ५ कोटी रूपांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन अग्निशमन केंद्रे व छोटे अग्निशमन केंद्रे बांधण्याकरिता २८ कोटी ९७ लाख रुपयांची तरतु करण्यात आली आहे.

फायर ड्रोन, रोबोट्सचा समावेश होणार - 
मुंबई अग्निशमन दलाला अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी १५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात फायर ड्रोन, रोबोट्स, ६४ मीटर पेक्षा जास्त उंचीची टर्न टेबल लॅडर, डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली इत्यादींचा समावेश आहे. फायर ड्रोनच्या मदतीने उत्तुंग इमारतींवर व इतर ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती मिळवणे सोपे जाणार आहे. तर आगीवर रोबोट्सच्या सहाय्याने नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom