Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

हँकॉक पुलाच्या बांधकामासाठी पालिकेची मंजुरी


मुंबई । प्रतिनिधी -
मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील हँकॉक पुल रहदारीसाठी असुरक्षित असल्याने २०१६ मध्ये पाडण्यात आला होता मात्र गेल्या दोन वर्षात याठिकाणी दुसरा पुल बांधण्यात पालिकेला अपयश आले होते. पुलाच्या गैरसोयींमुळे नागरिकांना त्रास होत आहे. यासाठी न्यायालयानेही पालिकेला खडसावले होते. पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत ५१ कोटी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे दोन वर्षाने हँकॉक पुल उभारण्याचा मोकळा झाला आहे.

हँकॉक पुल हा माझगाव मधील रहिवाशांना ये - जा करण्यासाठी उपयोगी होता. मध्य रेल्वेने हा पुल असुरक्षित असल्याचे जाहीर केल्याने ९ व १० जानेवारी २०१६ या दोन दिवसात पाडण्यात आला. रेल्वे व महापालिकेने पुल पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था केली नव्हती. तसेच पाडलेला पुल पुन्हा केव्हा बांधणार याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली गेली, न्यालयायला हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली. यावर न्यायालयाने पालिका व मध्य रेल्वेला फैलावर घेतले. यामुळे महापालिकेने पुलाच्या उभारणीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्यास ४ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. यामध्ये मेसर्स साई प्रोजेक्ट्स प्रा. लि. ने सर्वात कमी खर्चात पुल उभारण्यासाठी निविदा भरली होती. मेसर्स साई प्रोजेक्ट्स प्रा. लि. ला ५१ कोटी ७० लाख १२ हजार ९२९ रुपये इतका खर्च करून पुल उभारण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध केला नसल्याने पुल बांधण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. या पुलाची लांबी ६४.६२ मीटर, रुंदी ३०.०८ मीटर असून पुलाचे पृष्ठीकरण डीबीएम आणि मास्टिक अस्फाल्टचे असणार आहे. आर.सी.सी.वॉल टाईप पाईल्स पद्धतीचे या पुलाचे पायाचे बांधकाम असणार आहे. तसेच स्टील गर्डर व आर.सी.सी. डेक स्लॅब प्रकारचे बांधकाम असणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom