औरंगाबाद महापालिका बरखास्त करा - इम्तियाज जलील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

औरंगाबाद महापालिका बरखास्त करा - इम्तियाज जलील

Share This
मुंबई - औरंगाबाद महापालिका तत्काळ बरखास्त करण्याची तसेच नागरिकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी विधानसभेत केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असून एका चांगल्या अधिकाऱ्यांची तीन वर्षासाठी नेमणूक करावी, असेही ते म्हणाले आहेत. औरंगाबाद शहरातील कचराप्रश्न गंभीर बनला आहे. गावात कचरा टाकू नये, यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जो लाठीमार केला तो चुकीचा आहे. संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. कचऱ्यांचा प्रश्न हा मागील २५ वर्षांपासूनचा प्रश्न आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून हा प्रश्न योग्य पद्धतीने सोडविला गेलेला नाही. औरंगाबाद महापालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे. अशी भ्रष्ट महापालिका तत्काळ बरखास्त करा, अशी मागणी जलील यांनी यावेळी केली. माझ्या पक्षाचे २५ नगरसेवक औरंगाबाद महापालिकेत निवडून आलेले आहे. २५ नगरसेवक असतानादेखील मी औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची आपल्याकडे मागणी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबाद येथील कचऱ्याच्या प्रश्नावर आमदार संजय शिरसाट, अतूल सावे यांनीदेखील प्रश्न उपस्थित केला. याप्रश्नी पोलीस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोपही या आमदारांनी यावेळी केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages