मुंबई । प्रतिनिधी - पश्चिम रेल्वेच्या एल्फिस्टन रोड स्थानकात २९ सप्टेंबरला चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृत व जखमींना तब्बल सहा महिन्याने आर्थिक मदत देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड आणि मध्य रेल्वेच्या परेल स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर पुल पडत असल्याची अफवा पसरून चेंगराचेंगरी झाली होती. यात २३ प्रवाशी मृत्युमुखी पडले होते तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील मृतकांना प्रत्येकी ८ लाख रुपये, गंभीर जखमींना ४ ते ७ लाख आणि किरकोळ जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. ती मदत मृतकांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना आज देण्यात आली.