विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2018

विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार


मुंबई - विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून विरोधी पक्षातील सदस्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणलेला असताना तो ठराव चर्चेला न घेता राज्य सरकारकडून त्यांच्यावर विश्वास दाखविणारा ठराव मांडत लोकशाही मुल्याची मोडतोड केल्याची तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आमदारांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेऊन केली. यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार होते. यावेळी विरोधकांनी राज्य सरकारने विधानसभेत घ़डलेल्या घटनांची माहिती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ठराव आणि त्या अनुषंगाने दिलेले संदर्भ कसे चुकीचे आहेत याची माहिती राज्यपालांना दिली.

Post Bottom Ad