जुन्या इमारतींना १५ टक्के एफएसआय मोफत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जुन्या इमारतींना १५ टक्के एफएसआय मोफत

Share This

मुंबई - मुंबईतील जुन्या ३० वर्षांवरील इमारतींचा पुनर्विकास करताना या इमारतीतीतील सभासदांना सुरुवातीला १५ टक्के अतिरिक्त वाढीव चटई क्षेत्र विनामूल्य मिळत होते. मात्र नव्या विकास आराखड्यानुसार त्यानंतरचा अतिरिक्त एफएसआय रेडिरेकनरनुसार विकत घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे जुन्या इमारतींचा विकास करणे सोपे होणार आहे, अशी माहिती विकास नियोजन विभागाचे उप अभियंता विवेक मोरे यांनी सांगितले.

नवीन विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात रहिवाशांना काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. जुन्य़ा इमारतींच्या पुनर्विकास करताना 15 टक्के एफएसआय मोफत मिळत होता. याची माहिती विकासक रहिवाश्याना देत नव्हते. विकासक आपण स्वतःच नागरिकांना हा एफएसआय देत आहोत असा आव आणत होते. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत होती. आता नव्या आराखड्यानुसार जुन्या इमारतींना 15 टक्के एफएसआय दिला जाणार आहे, मात्र त्यानंतर लागणारा अतिरिक्त एफएसआय विकासकाला रेडीरेकनरच्या दरानुसार विकत घ्यावा लागणार आहे. यामुळे रहिवाशांच्या हक्काचा एसएसआय त्यांना मोफत मिळणार आहे. याचा फायदा स्वयं विकास करणाऱ्यांना होईल. इमारतीची वयोमर्यादा ओसी मिळाल्यावर, किंवा त्या इमारतीचे काम कधी सुरु झाले तेव्हापासून धरली जायची आता त्यात बदल करण्यात आला आहे. मात्र त्यात बदल करण्यात आला आहे. इमारतीची तपासणी (असेसमेंट) केल्यापासून त्या इमारतीची वयोमर्यादा ठरवली जाणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

गच्चीवर गार्डन - 
नव्याने बांधण्यात येणा-या इमारतीत ग्राहकांच्या मागणीनुसार इमारतीच्या गच्चीवर उद्यान बनवणे शक्य होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन हा नवीन बदल केला असून इमारतीच्या खालील मोकळ्या जागेत उद्यान असणे गरजेचेच असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages