मेट्रोच्या कामामुळे मगरीच्या उद्यानाचे काम लटकले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रोच्या कामामुळे मगरीच्या उद्यानाचे काम लटकले

Share This

मुंबई - मुंबई महापालिकेकडून पवई तलावात मगरीचे उद्यान बनवण्यात येणार होते. मात्र मेट्रोच्या कामांमुळे हे क्षेत्र बाधित होणार असल्याने कामाच्या निविदांना प्रशासनाने स्थगिती दिल्याची माहिती प्रशासनाकडून साठई समितीत देण्यात आली आहे. प्रशासनाने निविदांना स्थगिती दिल्यामुळे पवई तलावातील मगरीच्या उद्यानाचे काम लटकले आहे.

पवई तलावांत बाजूच्या निवासी संकुलांमधून सांडपाणी सोडले जाते. काही वाहनचालकांकडून तेथे वाहनेही धुतली जातात. शिवाय अनधिकृतपणे मासेमारीही केली जाते. त्यामुळे येथील मगर, मासे अशा जलचरांच्या जीविताला हानी पोहचून तेथील मगरींची संख्या कमी होत आहे. त्यांची संख्या वाढवून अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी येथे मगरीचे उद्यान म्हणून घोषित करावे. तसेच येथे सांडपाणी सोडण्यास व मासेमारी करण्यावर बंदी घालावी. मुंबईत पहिले मगरीचे उद्यान व पर्यटन विकसित केल्यास मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल, अशी ठरावाची सूचना काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक प्रवीण छेडा यांनी मांडली होती. याकडे लक्ष वेधून पालिका आयुक्तांनी सकारात्मक निर्णय़ घेतला. त्यानुसार पवई तलावाचे संवर्धन करण्यासाठी तलावाच्या पाण्याची गुणवत्ता वाढवण्याच्यादृष्टीने एरिशन व डिओ मोनेटरिंग सिस्टिम बसवून पवई तलावात येणारे सांडपाणी वळवण्यासाठी पाणी पुरवठा व मलनीःसारण प्रकल्प खात्यामार्फत निविदाही मागवण्यात आल्या. हे काम फेब्रुवारी 2018 पर्यंत सुरू होणार होते. या पार्श्वभूमीवर मगरींसाठी स्वतंत्र उद्यान विकसित करण्याबाबत ठरले. पवई तलावाचा दिर्घकालीन स्थापत्य विकास कामामध्ये समाविष्ट करून निविदाही मागवण्यात आली होती. मात्र सदर कामे प्रस्तावित मुंबई मेट्रो- 6 च्या कामांमुळे बाधित होणार असल्याने संबंधित निविदा प्रशासनाला स्थगित कराव्या लागल्या असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान तलावातील जाळ्या लावून होणारी अनधिकृत मासेमारीवर बंदी घालावी, तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी, नादुरुस्त झडपा दुरुस्ती करण्यात याव्यात अशी मागणी नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीत केली. या बाबींकडे लक्ष दिले जाईल, असे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages