Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

दहावीच्या पुस्तकांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ


पुणे - दहावीची नवीन अभ्यासक्रमावर आधारित राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाकडून (बालभारती) प्रकाशित होणाऱ्या नव्या पुस्तकांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही सर्व पुस्तके ६६४ रुपयांना ३ एप्रिल पासून बाजारात उपलब्ध होणार आहेत.

यावर्षी दहावीसह पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदला आहे. ज्ञानरचनावाद या रचनेनुसार अध्यापन सुलभ व्हावे, अशा दृष्टीने नव्या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. यापूर्वीचा अभ्यासक्रम घोकंपट्टी, पाठांतरावर भर असणारा होता. आता कृतिशील आणि उपाययोजना यावर आधारित अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. इयत्ता आठवी आणि पहिलीची बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेही टप्प्याटप्प्याने बाजारात येतील, असे सांगण्यात आले आहे. दहावीच्या नव्या पुस्तकांबाबत माहिती देण्यासाठी ४ एप्रिल रोजी मुंबईत अभ्यास मंडळातील सदस्यांबरोबर संवादाचे आयोजनही बालभारतीने केले आहे.

दरम्यान  दहावीसह आठवीच्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचा धडा वाचल्यानंतर, तुम्हाला काय संदेश मिळाला, तुमचे मत सांगा, याचे महत्त्व तुमच्या शब्दांत मांडा, तुम्ही केलेली निरीक्षणे नोंदवा', अशा स्वरूपाचे प्रश्न धड्याखाली विचारल्याचे दिसणार आहे.

पुस्तकांच्या किमती.
विषय                आधीची       आताची.
कुमारभारती           ६१              ७३
बिजगणित             ६३              ८०
इंग्रजी                    ९८             ८८
भूमिती                   ७१             ७७
इतिहास                  ५४             ५६
भूगोल                    ५४             ४३
हिंदी                       ६५             ५७
विज्ञान                    ९१           १४०

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom