लाखो लिटर पाणी वाया -
मुंबई - मेट्रोच्या कामामुळे सोमवारी सकाळी काळबादेवी येथे पाणीपुरावठा करणारी 48 इंचाची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या विभागातील पाणीपुरावठा खंडित केल्याने विभागातील रहिवाश्यांचे प्रचंड हाल झाले.
काळबादेवी येथे मेट्रोचे काम सुरू आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास तेथे बोरिंगचे काम सुरू असतानाच अचानक सी वार्डला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा करणारी ४८ इंचाची जलवाहिनी फुटली. यामुळे परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या जलखात्याच्या अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. या घटनेमुळे सी वार्डमधील काळबादेवी, ठाकुरद्वार, भुलेश्वर, चिराबाजार, एल. टी. मार्ग या भागातील पाणीपुरवठयावर याचा विपरीत परिणाम झाला. मोठया प्रमाणात पाणी वाया गेल्याने या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. विशेषतः इमारतीतील वरच्या मजल्यावरील लोकांना याचा जास्त फटका बसला. काही ठिकाणी पाणी न मिळाल्याने तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली असून त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.
No comments:
Post a Comment