मुंबई । जेपीएन न्यूज -
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे अंदाजपत्रक तयार केल्याने मुलुंड येथील एम. टी. आगरवाल रुग्णालयाच्या पुणर्बांधणीचे काम रखडले आहे. त्यामुळे रखडलेल्या रुग्णालयाच्या पूनर्विकासाठी भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी आमदार सरदार तारासिंग, नगरसेवक व मुलुंडकरासोबत एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
एम टी आगरवाल रुग्णालयाच्या पुर्नबांधणीच्या कामासाठी ३ ते ४ निविदा काढण्यात आल्या होत्या. कधी कमी प्रतिसादामुळे तर कधी अंदाजित दरापेक्षा अधिक दरामुळे निविदा बाद करण्यात आल्या. त्यामुळे निविदेतील अंदाजपत्रक चुकीचे असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप करत प्रकाश गंगाधरे यांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. २०१४ पासून पालिकेने नूतनीकरणाच्या निविदा मागवायला सुरुवात केली होती. एकूण २५ वेळा हॉस्पिटलची निविदा तयार करण्यात आली. परंतु, वारंवार त्यात त्रुटी आढळून आल्याने ती अंतिम टप्प्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून या रुग्णालयाची मुख्य इमारत बंद आहे. त्यामुळे रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे २०० बेडचे असलेले हे रुग्णालयाचा पुनर्विकास झाल्यावर येथे ४५० बेड उपलब्ध होणार आहेत. यात सर्व अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येणार असून त्यावर ३०० कोटी पालिका खर्च करणार आहे. तशी तरतूद देखील करण्यात आली असली तरी निविदा प्रक्रिया होत नसल्याने रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम रखडले आहे. त्यामुळे मुलुंड एम.टी.अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्विकास व अत्याधुनिकरणास न्याय मिळवून देण्यासाठी, नागरिकांच्या आरोग्याचे होणारे हाल थांबविण्यासाठी लाक्षणिक उपोषण केल्याचे गंगाधरे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बैठक बोलवली असून याबैठकीत रुग्णालयच्या पुनर्विकासाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment