पिण्याव्यतिरिक्त पाण्यासाठी वापर केला जाणार -
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात अनेकवेळा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने नागरिकांना पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. नागरिकांना पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जाऊ नये म्हणून पिण्याव्यतिरिक्त लागणाऱ्या पाण्यासाठी पालिकेच्या उद्यानात व मैदानात पाणी साठवून त्याचा वापर करावा अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. नगरसेवकांची मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. टाळावा क्षेत्रात अनेकवेळा पाऊस कमी पडल्याने नागरिकांना 10 ते 20 टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागले आहे. पाणी कपात लागू असताना उंच टेकडीवर राहणाऱ्या नागरिकांना विशेषकरून पाणीकपातीचा सामना करावा लागतो. नागरिकांना होणार त्रास कमी करावा म्हणून नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमधून रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना पालिकेने राबविली होती. मात्र याला विकासकांनी हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पाणी बचत करणे ही काळाची गरज असल्याने पावसाचे पाणी उद्याने आणि मैदानांमध्ये मुरवून भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्याची मागणी माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे व नगरसेवक जावेद जुनेजा यांनी केली होती. स्वप्ना म्हात्रे यांनी या साठवल्या पाण्याचा वापर उद्यानात व मैदानात करावा अशी सूचना केली होती. तर जावेद जुनेजा यांनी गेटमधून वाहून जाणारे पाणी वाचवून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी करावा अशी सूचना केली आहे. या सूचनांवर पालिका आयुक्तांनी अभिप्राय देताना उद्याने, मैदानात कूपनलिकेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. पिण्याच्या पाण्याचा वापर उद्याने, मैदाने यासाठी करण्यात येत नाही. तरीही पालिकेच्या मालिकीच्या उद्यानात व मैदानात वर्षा जल संचलन व विनियोग पद्धत राबविण्याची शक्यतेची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे म्हटले आहे.
मुंबईला होणारा पाणीपुरवठा --
मुंबईला वर्षभरासाठी एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. हे पाणी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या तलावांमधून पुरवठा केले जाते. मुंबईला दररोज 4500 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून 3900 दशलक्ष लिटर पाणी आणून त्यापैकी 3750 दशलक्ष लिटर पाणी मुंबईत आणले जाते. उर्वरित 150 दशलक्ष लिटर पाणी ठाणे, भिवंडी आणि निजामपूरला पुरवले जाते.
No comments:
Post a Comment