गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांची संख्या 4 - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2018

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांची संख्या 4


मुंबई - गोरेगाव पश्चिम येथील एस.व्ही. रोडवर असलेल्या टेक्निक प्लस या व्यावसायिक इमारतीतील 7 व्या मजल्यावर रविवारी लागलेल्या भीषण आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 4 वर पोहचला आहे. अन्य तिघांवर सिद्धार्थ रुग्णालयातात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

गोरेगाव पश्चिम येथील एमटीएनएल ऑफिसजवळील पवनबाग येथे असलेल्या टेक्निक प्लस या 12 मजली व्यावसायिक इमारतीच्या 7 व्या मजल्यावर काल सायंकाळी 4 वाजून 24 मिनिटांनी भीषण आग लागून यात नैमुद्दीन शेख (25), रामअवतार (45), रामतीर्थ पाल (45) या तिघांचा मृत्यू झाला . तर या घटनेत अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांसह 9 जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले काहींना उपचारानंतर लगेच सोडून देण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास शमशहादा शहा (24) याचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील बळींची संख्या 4 झाली आहे. तर शिवाजी, रामनरहरे व मोतीराम व्यंकटराव या अग्निशमन दलाच्या जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले. आग शॅार्टसर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जातो आहे.

Post Bottom Ad