न्यायालयाच्या आदेशानंतर लालबाग उड्डाण पुलाची दुरुस्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2018

न्यायालयाच्या आदेशानंतर लालबाग उड्डाण पुलाची दुरुस्ती


पालिका करणार 21 कोटीचा खर्च -
मुंबई - लालबाग पुलाच्या कामावरून न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर लालबाग उड्डाण पुलाच्या संरचनात्क व इतर दुरुस्ती करण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे. यासाठी तांत्रिक व फेरतपासणी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

निकृष्ट कामासाठी सतत चर्चेत राहिलेल्या लालबाग उड्डाणपुलाच्या संरचनात्मक तपासणी अहवालाशिवाय त्याच्या पृष्ठभागाच्या दुरुस्तीचे (रिसरफेसिंग अ‍ॅण्ड अलाइड वर्क्‍स) काम देऊन पालिकेने लोकांच्या पैशांचा अपव्यय केला आहे, असे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने पालिकेच्या मनमानी कारभारावर टीका केली. याप्रकरणी लक्ष घालून उड्डाणपुलाच्या संरचनात्मक दुरुस्तीबाबतचा योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर पालिकेने सदर पुलाची संरचनात्मक तपासणी करून संरचनात्मक व इतर प्रकारच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक व निविदा तयार करण्यात आली आहे. तसेच फेरतपासणीसाठी पालिकेने मे. आय.आय.टी. मुंबई यांची सल्लागार म्हणून निय़ुक्ती केली आहे. पुलाच्या खराब झालेल्या बेअरिंगची दुरुस्ती किंवा बदलणे, खराब झालेल्या एक्सपान्शन जॉईन्टस बदलणे, संरचनात्मक खराब झालेल्या भागाचे मजबुतीकरण करणे तसेच पुलाची इतर प्रकारची दुरुस्ती केली जाणार आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या कामासाठी 21 कोटी 63 लाख 84 हजार 327 रुपये खर्च केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad