मिठी नदीच्या कामांकडे पालिकेचे दुर्लक्ष - नगरसेविकेचा उपोषणाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 May 2018

मिठी नदीच्या कामांकडे पालिकेचे दुर्लक्ष - नगरसेविकेचा उपोषणाचा इशारा


मुंबई - मुंबईमध्ये २६ जुलै २००५ ला झालेल्या अतिवृष्टीवेळी मिठी नदीचे नाव पुढे आले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि संरक्षण भिंत बांधण्याची घोषणा करण्यात आली मात्र अद्यापही संरक्षण भिंत बांधण्याचे व डेब्रिज उचलण्याचे काम केले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी आयुक्तांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईकरांनी २६ जुलैची अतिवृष्टी अनुभवली आहे. मिठी नदीमधून पाण्याचा निचरा झाला नसल्याने मुंबईची तुंबई झाली होती. मिठी नदीच्या बाजुने अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती त्यामुळे नदीपात्र छोटे झाल्याचे उघडकीस आले होते. यावर पर्याय म्हणून मिठी नदीची रुंदी वाढवताना नदीच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, नदी पात्रातील लोकांचे पुनर्वसन करणे इत्यादी उपाययोजना आखण्यात आल्या. त्यासाठी एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली. २०१४ नंतर मिठीनदीचे काम पालिकेकडे सोपवण्यात आल्यानंतर दरवर्षी फक्त नालेसफाई केली जात आहे. अर्धवट राहिलेल्या संरक्षण भिंतीचे काम गेले चार वर्षे रखडले आहे. संरक्षण भिंत नसल्याने पावसाळयात विभागातील नागरिकांच्या घरामध्ये अनेकवेळा पाणी शिरत असल्याचे प्रकार घडतात. भिंत नसल्याने नागरिक किंवा लहान मुले नदी पात्रात पडण्याची भीतीही असते. यामुळे वॉर्ड क्रमांक १६८ मधील ३०० मीटरहून अधिक रखडलेल्या भिंतीचे काम सुरु करावे अशी मागणी स्थानिक नगरसेविका सईदा खान यांनी पालिकेकडे केली आहे. याठिकाणी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी भेट दिली आहे. सिंघल यांच्या भेटीदरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी नाल्यातील गाळ काढण्याची जाबाबदारी पालिकेवर आहे. दगड, माती, विटा उचलण्याचे काम एमएमआरडीएचे असल्याचे स्पष्ट केले. 

एमएमआरडीएकडे याबाबत संपर्क साधल्यावर सदर जागा महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचे सांगण्यात येते. पालिका आणि एमएमआरडीए एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलत असल्याने गेल्या तीन ते चार वर्षात संरक्षण भिंत उभी राहिलेली नसल्याने पालिका आयुक्तांना पात्र देऊन एका आठवड्याचा वेळ दिला आहे. या एका आठवड्यात संरक्षण भिंतीचे काम सुरु न झाल्यास तसेच डेब्रिज न उचल्यास पालिका आयुक्तांच्या दालनात उपोषणाला बसू असा इशारा सईदा खान यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad