मेट्रोमुळे कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही - मेट्रोचा दावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 May 2018

मेट्रोमुळे कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही - मेट्रोचा दावा


मुंबई - पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून महापालिकेकडून नालेसफाई सुरु आहे. दरम्यान महापौरांनी मेट्रोच्या कामामुळे मुंबई तुंबणार असा आरोप केला आहे. या पार्श्वभुमीवर मेट्रो-३ मुळे मुंबईकरांना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नसल्याचा दावा एमएमआरसीकडून करण्यात आला आहे. मेट्रोच्या कंत्राटदारांना पावसाळ्याच्यादृष्टीने आवश्यक ती काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने दिल्या आहेत.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचं काम ३३.५ किमीच्या परिसरात सुरू आहे. या कामामुळे पावसाळ्यात वाहतूककोंडी होऊन नये वा पाणी साचून मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी एमएमआरसीकडून १ जूनपासून विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. एमएमआरसीच्या नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधत मुंबईकरांना मेट्रो-३ संदर्भातील तक्रारी नोंदवता येणार आहेत. पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई, पर्जन्य जलवाहिन्या वळवण्याची काम, पुरप्रवण भागात सिडीमेन्टेशन टाक्या बांधणं, पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करणं इत्यादी कामं एमएमआरसीकडून सुरू असून या कामांना वेग देण्यात आला आहे. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कंत्राटदारांना एमएमआरसीकडून आवश्यक त्या सूचना देत पावसाळ्यापूर्वीची कामं मार्गी लावण्यास सांगितल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकिय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली. मेट्रोच्या कामांमुळे मुंबईकरांना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नसल्याचा दावा एमएमआरसीकडून केला आहे. काही अडचण आलीच तर त्याच तात्काळ निराकरण केलं जाणार असल्याचं एमएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad