मुंबई । जेपीएन न्यूज -
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नालेसफाई सुरु आहे. नालेसफाईच्या कामाची महापौरांकडून पाहणी सुरु आहे. मात्र त्यांची पाठ फिरताच नालेसफाईची कामे बंद करून कंत्राटदार आणि त्यांचे कामगार त्या ठिकाणाहून पसार होत आहेत. यामुळे नालेसफाई सुरु असल्याचा दिखावा केला जात असल्याची चर्चा सुरु आहे.कंत्राटदार कामगार पसार -
पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून एप्रिल पासून नालेसफाई सुरु होते. ही नालेसफाई मे महिन्याच्या शेवटपर्यंत तर कधी कधी जून पर्यंत सुरु असते. नालेसफाई योग्य रित्या सुरु आहे का हे पाहण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पालिकेतील प्रमुख असलेले महापौर आपल्या इतर पदाधिकाऱ्यांसह पाहणी दौरा करतात. असाच दौरा महापौरांनी मागील बुधवारी पश्चिम उपनगरात केला होता. त्यानंतर त्यांनी आज पूर्व उपनगरमधील नाल्यांची पाहणी केली. या दोन्ही ठिकाणी पाहणी करताना महापौरांना नाल्यामध्ये उतरून काम करणारे तीन चार कामगार सफाई करत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र महापौरांनी पाठ फिरवताच कंत्राटदार या कामगारांना त्या त्याठिकाणाहून काम बंद करून निघून जाण्यास सांगत आहेत.
कंत्राटदारांवर अद्याप कारवाई नाही -
बुधवारी पूर्व उपनगरच्या नाल्यांची पाहणी करताना महापौरांनी घाटकोपर येथील लक्ष्मीबाग नाल्याची तसेच भांडुप येथील बॉंम्बे केमिकल नाल्याची पाहणी केली. या दोन्ही ठिकाणी तीन चार कामगार काम करत होते. महापौरांनी कामाची पाहणी केली. कामे संस्थ गतीने सुरु असल्याने लक्ष्मीबाग नाल्याचे काम करणाऱ्या एम मोना व बॉंम्बे ऑक्सिजन नाल्याचे काम करणाऱ्या भारत कन्सल्टंटला नोटीस देऊन कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिले. महापौर आदेश देऊन गाडीत बसून पुढच्या नाल्याच्या पहाणीसाठी निघाल्यावर कंत्राटदारांनी या कामगारांना काम बंद करून बाहेर पडण्यास सांगितले. महापौरांनी याआधीही कंत्राटदारांवर कारवाई करावी असे सांगितले त्यानंतरही अद्याप एकाही कंत्रादारावर कारवाई झालेली नाही.

No comments:
Post a Comment