सईदा खान यांचे आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2018

सईदा खान यांचे आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन


मुंबई - मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्यातील वादामुळे कुर्ला मिठी नदीच्या शेजारी बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीचे रखडले आहे. येथील डेब्रिज उचलले जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. 

२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीवेळी मुंबई तुंबली होती. मुंबई तुंबण्याची कारणे शोधताना मिठी नदीचे पात्र छोटे झाल्याचे व नदीपात्रात अतिक्रमण झाल्याचे समोर आले होते. मिठी नदीत संरक्षण भिंतीचे काम व नदी पात्र रुंद करण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाची नियुक्ती करण्यात आली. २०१४ नंतर मिठी नदीचे काम पालिकेकडे हस्तातंतरीत करण्यात आले. त्यानंतर संरक्षण बहिनीतीचे काम रखडले आहे. नदीपात्रात डेब्रिज पडून आहे. संरक्षण भिंत बांधावी व डेब्रिज उचलावे म्हणून स्थानिक नगरसेविका सईदा खान सातत्याने प्रयत्नात आहेत. पालिका प्रशासनाने नाल्यातील गाळ उचलण्याचे काम पालिकेचे आहे असे सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे खान यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांनंतरही पालिकेने दुर्लक्ष केल्याने त्यांनी बुधवारी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. खान यांच्यासमवेत या ठिय्या आंदोलनामध्ये नगरसेवक कप्तान मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरम्यान आजच 6 ट्रक डेंब्रिज उचलण्यात आले, उद्याही डेंब्रिज व गाळ उचलणार आहेत, संरक्षक भिंत उभारण्यासाठी सुप्रीम कोर्टात केस प्रलंबित असल्याने अडचण आहे, तो मुद्दा मार्गी लावून ते कामही लवकरच करू, असे आश्वासन आयुक्त् यांनी दिल्याने उपोषण मागे घेतल्याचे खान यांनी सांगितले
  
पत्रकारांना वृत्तसंकलनास बंदी - 
नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करत थेट आयुक्तांना आव्हान दिले. आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु असल्याने मीडिया आयुक्त कार्यालयाकडे येणार याची माहिती असल्याने प्रशासनाने आयुक्त कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले. मीडियाला प्रवेश नाकारण्यात आला. मीडियाने याविरोधात आवाज उचलल्यावर मीडियाला प्रवेश देण्यात आला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad