मुंबई - केंद्र सरकारने सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान मुंबईत राबवण्यासाठी, स्वच्छता ऍप डायलॊड करण्याचे आवाहन करण्यासाठी तसेच योजना अंमलबजावणी संस्था स्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकने तब्बल २० लाखांचा खर्च केला आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्वेक्षणामध्ये श्रीमंत असलेली मुंबई महापालिका सातत्याने अपयशी ठरली आहे. सर्वेक्षणात महापालिकेचा नंबर यावा म्हणून महापालिकेने आयनॉक्स थियेटरमध्ये स्वच्छता ऍप डाउनलोड व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ करिता नागरिकांना अभिप्राय, मत नोंदविण्याचे आवाहन केले होते. यासाठी पालिकेने ७ लाख ८१ हजार ८७२ रुपयांचा खर्च केला आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत योजना अंमलबजावणी संस्था स्थापन करण्यासाठी १२ लाख २६ हजार ८६ रुपये खर्च केले आहेत. पालिकेने हा खर्च डिसेंबर २०१७ त फेब्रुवारी २०१८ दरम्यान केला असून त्याची माहिती देणारा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment