मुंबई - रेल्वेला मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून संबोधण्यात येते. या लाइफलाईनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने एप्रिल महिन्यात 11 कोटी रुपये इतका दंड वसूल केला आहे.
मुंबईच्या लोकलमधून दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. या लाखो प्रवाशांबरोबर फुकट प्रवास करणाऱ्या परवाशांची संख्याही मोठी आहे. या फुकट्या प्रवाशांविरोधात रेलवे प्रशासनाकडून तिकीट चेकिंग अभियान चालवण्यात येते. एप्रिल महिन्यात चालवण्यात आलेल्या अभियानात 1 लाख 94 हजार 822 केसेस दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 11 कोटी 24 लाख 48 हजार 793 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर मागील वर्षी एप्रिल महिन्यात फुकट्या प्रवाशांविरोधात 1 लाख 54 हजार 672 केसेस दाखल करण्यात आल्या असून त्यामधून रेल्वेने 8 कोटी 59 लाख 64 हजार 760 रुपये इतका दंड वसूल केला होता.
दरम्यान मुंबई विभागाने एप्रिल महिन्यात चांगली कामगिरी केल्याने विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी शाबासकी दिली आहे. या आधी मे 2017 मध्ये 8 कोटी 87 लाख इतका दंड वसूल केला होता. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा असे आवाहन जैन यांनी केल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी दिली.
No comments:
Post a Comment