मुंबई - मानखुर्द, गोवंडी, चेंबूर येथील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अमर महाल ते ट्रॉम्बे जलबोगदा बांधण्यात येणार आहे. या जलबोगद्याच्या सल्लागारासाठी पालिका दहा लाख रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.
एम - पूर्व आणि एम पश्चिम विभागात अनेकदा पाण्याची कमरता जाणवते. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या अनेक वर्षाच्या जुन्या असून, त्यामुळे सध्याच्या स्थितीत असलेली पाण्याची गरज भागविली जात नाही. या विभागातील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रभागाच्या भविष्यातील वाढीव पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पालिका अमर महाल येथील हेडगेवार उद्यानापासून ट्रॉम्बे जलाशयापर्यंत जलबोगदा बांधणार आहे. या जलबोगद्याची लांबी ५.५ तर रुंदी २.५ मीटर असणार आहे. जलबोगद्याच्या कामासाठी पालिका मे . आयआयटी या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी पालिका दहा लाख रुपये खर्च करणार आहे.