Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेस्टचा बायोडिझेल खरेदी करण्याचा निर्णय


मुंबई - बेस्टने पर्यावरणपूरक उपक्रमासाठी बायोडिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या डिझेलच्या तुलनेत बायोडिझेल प्रति लिटर ३ रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे या निर्णयाचा इंधन खरेदीमध्येही फायदा होईल. 

सध्या बेस्टच्या ताफ्यात १३०० डिझेल बसेस आहेत. या बसेससाठी दररोज ८० हजार लिटर डिझेल वापरले जाते. संशोधनातून असे समोर आले आहे की, डिझेलसोबत १० टक्के बायोडिझेलचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे डिझेलच्या तुलनेत स्वस्त असलेलं बायोडिझेल वापरण्याचा उपक्रम बेस्टकडून राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांकडून हे बायोडिझेल खरेदी करून त्याचा वापर बेस्ट बसेससाठी करण्याचा हा प्रायोगिक प्रकल्प असेल. बेस्टला दररोज ७२ हजार ३५० लिटर डिझेल खरेदीसाठी ४६ लाख रूपये मोजावे लागतात. हे डिझेल ४ रूपयांनी स्वस्त मिळाले तरीही, दिवसाला ३ लाख २० हजार रूपये बेस्टला मोजावेच लागतील. मात्र बायोडिझलच्या खरेदीमुळे एका महिन्याला ९ लाख ६० हजारांची तर वर्षाला १ कोटी १६ लाख रूपयांची बचत शक्य आहे. याआधी २००४ साली बेस्ट उपक्रमाने अशाचप्रकरे बायोडिझेलचा प्रयोग राबवला होता. त्यावेळी डिझेलमध्ये ५ टक्के बायोडिझेलचा वापर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या प्रयोगाची अंमलबजावणी करणे बेस्टला शक्य झाले नाही. पुन्हा २०१२-१३ मध्ये या प्रकल्पाला गती मिळाली पण त्यावेळी आर्थिक चणचण उद्भवल्यामुळे हा प्रकल्प मागे पडला. सध्या बायोडिझेलला जीेएसटी लागू झाल्याने यामध्ये सवलत मिळावी यासाठी बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान जीएसटीत दिलासा मिळाला तर इंधन खर्च कमी व्हायला मदत होईल. सुरुवातीला बेस्टमध्ये बायोडिझेलचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. बॅकबे आणि शिवाजी नगर या दोन बस डेपोतील बसेससाठी सुरुवातीला हे बायोडिझेल वापरले जाईल. हैद्राबादची एक कंपनी बेस्टच्या दोन डेपोमध्ये बायोडिझेलचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी बायोडिझेल मिळवण्यापासून ते त्याचे वितरणाची जबाबदारी कंपनीची असेल. तसेच प्रकल्प देखभाल दुरूस्तीची जबाबदारीही या कंपनीवर असेल.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom