दोन बसमध्ये चिरडून युवतीचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दोन बसमध्ये चिरडून युवतीचा मृत्यू

Share This
मुंबई - कुर्ला पश्चिम येथील बस डेपोमध्ये बस मागे घेताना दोन बसच्या मध्ये चिरडून एका युवतीचा मृत्यू झालं आहे. आज (२२ जून) सकाळी ही घटना घडली. अमरीन सबा मुरतिजा शेख (२२) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. 

सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कुर्ला बस डेपोत ३२० रूट क्रमांकाचा बसचालक संजय पवार (५१) हा आपल्या ताब्यातील बस मागे घेत होता. त्यावेळी मागे उभ्या असलेल्या बसच्या गॅपमधून अमरीन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होती. पवार याने आपल्या ताब्यातील बस वेगाने मागे घेतल्याने दुसऱ्या उभ्या बसवर ती आदळली. यावेळी अमरीन नेमकी या दोन्ही बसमध्ये चिरडली गेली. गंभीर जखमी झालेल्या अमरीनला नागरिकांनी उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल कले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. कुर्ला पोलिसांनी या प्रकरणी बसचालक पवार याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages