Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

प्लास्टिकविरोधी कारवाई दरम्यान ३ लाख रुपयांचा दंड वसूल

मुंबई - राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केल्यावर मुंबईत रविवार पासून प्लास्टिक विरोधात कारवाई सुरु करण्यात आली. सोमवारी प्लास्टिकविरोधी कारवाई दरम्यान ३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

सरकारने २३ जून पासून प्लास्टिक बंदी लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी करताना मुंबई महापालिकेने रविवारपासून धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान रविवारी दिवसभरात पालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने ८६७ दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्या. त्यापैकी ७२ ठिकाणी प्रतिबंधित प्लस्टिक सापडले. रविवारी पालिकेने ५९१.६७ किलो प्लास्टिक जप्त केले असून ३ लाख ३५ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. तसेच ५ जणांनी दंड भरण्यास नकार दिल्याने अहवाल सादर केला आहे. तसेच सोमवारी शहरात प्लास्टिक विरोधी पथकाने ८०६१ आस्थापना आणि दुकानांना भेटी दिल्या. या दरम्यान २ लाख ९५ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी ९ जणांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरोधात अहवाल सादर करण्यात आला असल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom