मुंबईत ४ दिवस धोक्याचे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 July 2018

मुंबईत ४ दिवस धोक्याचे


मुंबई - जुलै महिन्याच्या प्रारंभी रिमझिम बरसणाऱ्या पावसाने शनिवार मध्यरात्री पासून चांगलाच जोर धरला . मंगळवारपर्यंत मुंबईत धो - धो पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले तसेच रेल्वे रुळही पाण्याखाली गेले.मात्र यादरम्यान समुद्राला मोठी भरती नव्हती .त्यामुळे भरतीचे पाणी शहरात शिरून मुंबई पूर्णपणे ठप्प झाली नाही. गेल्या महिन्यात १३ ते १८ जून या कालावधीतही समुद्रात साडेचार मीटरपेक्षाही उंच लाटा उसळल्या. मात्र यादरम्यान मोठा पाऊस नसल्याने याचाही तितकासा परिणाम जाणवला नाही. दरम्यान, शनिवार १४ जुलै ते मंगळवार १७ जुलै यादरम्यान समुद्राला मोठी भरती असून समुद्रात शनिवारी ४.९६ ,रविवारी ४.९७ सोमवार ४.८९ व मंगळवारी ४.७० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या कालावधीत मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई ठप्प होण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad