भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था

Share This

नवी दिल्ली - विकासाच्या मोठ्या तयारीमुळे व झेपेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने आता मोठी भरारी साध्य केली आहे. फ्रान्सला मागे टाकून भारताने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सहाव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार भारतीय अर्थव्यवस्था आता सहाव्या क्रमांकावर आली आहे. फ्रान्सला सातव्या क्रमांकावर मागे टाकून भारताने हा क्रमांक मिळवला आहे.

भारताचा जीडीपी गेल्यावर्षी २.५९७ ट्रिलियन डॉलर इतका होता व फ्रान्सचा २.५८२ ट्रिलियन डॉलर इतका होता. अनेक तिमाहींच्या मंदीनंतर भारताची अर्थव्यवस्था जुलै २०१७ पासून पुन्हा बळकट होत आहे. भारताची लोकसंख्या सध्या १ अब्ज ३४ कोटी इतकी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनेही वाढ होत आहे. फ्रान्समध्ये लोकसंख्या ६ कोटी ७ लाख आहे. त्यामुळे फ्रान्सच्या लोकसंख्येच्या तुलनेत भारत प्रतिव्यक्ती उत्पन्नाचा विचार करता कैकपटीने मागे आहे. नोटबंदी व जीएसटी यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्यास काहीसा अडसर आला. त्यानंतर गेल्यावर्षी उत्पादन व ग्राहक खर्च यामध्ये वाढ झाली. दहा वर्षांमध्ये भारताचा जीडीपी दुप्पट झाला असून, त्या तुलनेत आता चीनची गतीही कमी पडू शकते, असे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारताची यावर्षीची वृद्धी ७.४ टक्के इतकी असू शकते. करसुधारणा व देशांतर्गत खर्च यामुळे २०१९ मध्ये भारताचा हा विकास दर ७.८ टक्के होऊ शकतो. जागतिक सरासरी विकास दर ३.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. लंडनमधील एका सल्लागार संस्थेने गेल्यावर्षी आपल्या अहवालात म्हटले होते की, जीडीपीच्या दृष्टीने भारत ब्रिटन व फ्रान्स यांना मागे टाकू शकतो. इतकेच नव्हे २०३२ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थाही बनेल. सध्या जगाच्या या अर्थव्यवस्थेच्या क्रमांकामध्ये अमेरिका प्रथम स्थानी असून, त्यानंतर चीन, जपान व जर्मनी यांचा क्रमांक येतो.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages