Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

सूचना व हरकती नोंदविण्यासाठी १ महिन्याचा कालावधी


मुंबई - 'महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६' च्या तरतूदीन्वये बृहन्मुंबई मंजूर विकास आराखडा - २०३४ आणि विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली - २०३४ या अनुषंगाने राज्य शासनाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेले बृहन्मुंबई महापालिकेच्या तिन्ही भागांचे नकाशे जनतेच्या माहितीसाठी व अवलोकनार्थ portal.mcgm.gov.in वा www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये शहर भाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या तिन्ही भागांच्या नकाशांचा समावेश आहे. सदरहू आराखड्यातील सारभूत बदलांच्या नकाशांबाबत सूचना व हरकती या राज्य शासनाच्या अखत्यारितील नगररचना खात्याच्या उपसंचालकांकडे नोंदवावयाच्या आहेत. यानुसार यापूर्वीच महापालिकेच्या संकेतस्थळावर 'अपलोड'करण्यात आलेल्या शहर भागाशी संबंधित नकाशांवर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी ५ ऑगस्ट २०१८ ही अंतिम मुदत असून, पश्चिम उपनगरांसाठी १६ ऑगस्ट २०१८ ही अंतिम तारीख आहे. तर नुकत्याच 'अपलोड'करण्यात आलेल्या पूर्व उपनगरांच्या नकाशांसाठी २५ ऑगस्ट २०१८ ही अंतिम मुदत आहे, अशी माहिती पालिकेच्या विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता  संजय दराडे यांनी दिली आहे.

'महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६' च्या तरतूदींनुसार "मुंबई शहर व उपनगरांचा विकास आराखडा(२०३४), विकास नियंत्रण व प्रोत्साहक नियमावली (२०३४)'' यास दि. ८ मे २०१८ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे सारभूत स्वरुपाचे बदल वगळून मंजूरी देण्यात आली आहे. ही अधिसूचना दि. १३ – २३ मे २०१८ च्या शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरहू आराखड्यातील सारभूत स्वरुपाच्या फेरबदलांच्या अनुषंगाने सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि. ८ मे २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेबाबत दि. २२ जून २०१८ रोजी शुद्धीपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार सदर आराखड्यातील मंजूर भाग दि. १ सप्टेंबर २०१८ पासून अंमलात येईल. तसेच राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दि. ८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेबाबत दि. २९ जून २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे शुद्धीपत्रक व पूरकपत्रक जारी केले आहे. ही अधिसूचना देखील महापालिकच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर भागाचे नकाशे दि. ५ जुलै २०१८ पासून महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असून यासाठी सूचना व हरकती नोंदविण्यासाठी ५ ऑगस्ट २०१८ अंतिम मुदत आहे.तर पश्चिम उपनगरांशी संबंधित नकाशे हे दि. १६ जुलै २०१८ पासून संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यासाठी सूचना व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख ही १६ ऑगस्ट २०१८ आहे. तसेच पूर्व उपनगरांसाठी संबंधित नकाशे हे दि. २५ जुलै २०१८ पासून संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यासाठी सूचना व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख ही २५ ऑगस्ट २०१८ आहे. हे नकाशे महापालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीच्या दुस-या मजल्यावरील सभागृह क्र. ३ मध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या कालावधी दरम्यान बघण्यासाठीही उपलब्ध आहेत.

नकाशे कसे पाहाल - 
- प्रथम portal.mcgm.gov.inwww.mcgm.gov.in संकेतस्थळ उघडावे.
- संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील 'संबंधित दुवे' (इंग्रजीमध्ये 'Related Links') या रकान्यातील 'अधिक' (More) या दुव्यावर 'क्लिक' करावे.
- त्यानंतर उघडणा-या पानावरील 'Draft Development Plan 2034' या दुव्यावर 'क्लिक' करावे.
- यानंतर जे पान उघडेल त्या पानावर असणा-या 'Development Plan 2034 (Excluded Part – City) EP Sheet 8 May 2018' या दुव्यावर 'क्लिक' करावे.
- त्यानंतर उघडणा-या पानावर 'Eastern Suburbs', 'Island City' आणि 'Western Suburbs' असे तीन दुवे आहेत. या दुव्यांवर 'क्लिक' केल्यानंतर संबंधित नकाशे बघता येऊ शकतील.

वरील तपशीलानुसार नकाशांच्या अनुषंगाने सूचना व हरकती या अंतिम तारखेपूर्वी मांडता येणार आहेत.सदर सूचना व हरकती या 'उपसंचालक, नगररचना, बृहन्मुंबई, ई ब्लॉक, इएनएसए हटमेंट, आझाद मैदान,महापालिका मार्ग, मुंबई – १' यांच्या कार्यालयात सादर करावयाच्या आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom