मराठा आरक्षणाची दखल न घेतल्याने राज्यात उद्रेक - शरद पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२४ जुलै २०१८

मराठा आरक्षणाची दखल न घेतल्याने राज्यात उद्रेक - शरद पवार

नवी दिल्ली - मराठा आरक्षणावरून सध्या निर्माण झालेली स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पावले उचलण्याची गरज होती, मात्र तसे न करता त्यांनी आपण विठ्ठल पूजेला गेल्यास वारकऱ्यांना त्रास होईल, अशी साप सोडणारी विधाने केली. यात राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची भर पडली आणि आंदोलकांचा संताप अनावर झाला, असे सांगत राज्यातील परिस्थिती चिघळण्यास ही मंडळी जबाबदार आहेत असा, हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राज्य सरकारने आपली बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. धनगर आणि मुस्लीम समाजातील काही वर्गांची आरक्षणाची मागणी गंभीर असून सरकारने तिचा सहानुभूतीने विचार केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.


Post Bottom Ad

JPN NEWS