नागपूर - वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाई - वनमंत्री
वन विभागाच्या मागण्यांवर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले,राज्यात वन्य जीवांच्या हल्ल्यांमध्ये बळी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना पूर्वी आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जात असे. त्यात आता दोन लाख रुपयांनी वाढ करुन ही भरपाई दहा लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामध्ये रोख तीन लाख रुपये तर सात लाख रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या नुकसान भरपाईत देखील वाढ करण्यात आली असून 25हजारांवरुन ही रक्कम आता 40 हजार एवढी करण्यात आली आहे.Post Top Ad
09 July 2018
वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाई
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.