ग्राम बालविकास केंद्र योजना राज्यभर राबविणार - पंकजा मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2018

ग्राम बालविकास केंद्र योजना राज्यभर राबविणार - पंकजा मुंडे

नागपूर, दि. 10 / 7 / 2018 - राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी याआधी ग्राम बालविकास केंद्र ही योजना आदिवासी भागात राबविली जात होती. ती आता संपूर्ण राज्यात राबविणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, सार्वजनिक आरोग्य,आदिवासी विकास, महिला व बालविकास आणि मृद व जलसंधारण या विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्याला उत्तर देताना मुंडे बोलत होत्या. राज्य शासनाने अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक ठिकाणी अनाथ असल्याची बनावट प्रमाणपत्रे बनवून आरक्षणाचा लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशी बनावट प्रमाणपत्र बनवून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad