Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू : सुरेश प्रभू

नवी दिल्ली - कोकण रेल्वेच्या 103 किलोमीटर लांबीच्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून या रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिली.

कोकण रेल्वेच्या कामासंबंधी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर प्रभू यांनी ही माहिती दिली. यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष, प्रकल्प संचालक, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रभू म्हणाले, 103 किलोमीटर लांबीच्या या नवीन रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. तसेच, महाराष्ट्राचा किनाऱ्यावरील क्षेत्राशी संपर्क वाढणार आहे. यामुळे या क्षेत्रात असणाऱ्या बंदरांचा जलद गतीने विकास होईल. कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 50 टक्के खर्च रेल्वे मंत्रालय तर 50 टक्के खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी 40 अब्ज डॉलरचा निधी लागणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प 2022 पर्यंत बनून तयार होऊ शकतो या प्रकल्पातून दरवर्षी 60 लाख मेट्रिक टन तेल शुध्दीकरण होऊ शकते. यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहेत. याकरिता या रेल्वे मार्गाचे विशेष महत्त्व आहे.

नवीन 10 स्थानके बनणार -
कोकणातील लहान शहरे तसेच गावांना रेल्वेचा लाभ व्हावा यासाठी कोल्हापूर-वैभवाडी रेल्वे मार्गावर नवीन 10 छोटी स्थानके बनविण्यात येतील. यामध्ये इंदापूर, गोरेगाव, सापेवामने, कल्बानी, कडवई, वारवली, खारेपाटण, आचिरने, मिरजन, इनांजे या 10 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या स्थानकाचे उद्घाटन जानेवारी 2019 पर्यंत होणार असल्याची माहिती, प्रभू यांनी यावेळी दिली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom