Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

माहीम रेल्वे व मेट्रो स्थानकाला बाबा मकदूम शहा यांचे नाव द्या

मुंबई - हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बाबा माहीम मकदूम शहा यांचा माहीम येथे सुप्रसिद्ध असा दर्गा आहे. या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात. बाबा मकदूम शहा यांच्यामुळे या स्थानकाला वेगळी ओळख निर्माण झाली असल्याने माहीम रेल्वे व मेट्रो स्थानकाला बाबा मकदूम शहा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी बहुजन परिषद रिपब्लिकन फोर्सचे अध्यक्ष यशवंत गंगावणे यांनी आज मुंबईत केली.  

माहीम येथे बाबा मकदूम शहा यांचा 600 वर्षांपासूनचा दर्गा आहे. या दर्ग्याला एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून त्याची एक वेगळी ओळखही आहे. या दर्ग्याला सर्व धर्माचे लोक भेट देतात. त्यातून सर्वधर्मसमभाव हा संदेश जनतेत जातो. यामुळे मेट्रोच्या स्थानकाला आणि माहीम स्थानकालाही बाबा मकदूम शहा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गंगावणे यांनी केली. मागील अनेक वर्षांपासून सरकारकडे यासाठीची मागणी केली जात आहे. सरकारने याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा दलित आणि मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत स्थानिक कोळी बांधव आणि इतर समाजाचे कार्यकर्ते माहीम स्थानकाचे नामकरण करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom