मोबाइलमध्ये UIDAI क्रमांक गुगलच्या चुकीमुळं - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2018

मोबाइलमध्ये UIDAI क्रमांक गुगलच्या चुकीमुळं


नवी दिल्ली - अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाइलमध्ये २०१४मध्ये १८००३००१९४७ हा हेल्पलाइन क्रमांक अँड्रॉइडमध्ये कोड करण्यात आला होता. हा क्रमांक आणि ११२ हा आपत्कालीन क्रमांक अनावधानानं अँड्रॉइडच्या सेटअप विझार्डमध्ये कोड करण्यात आला होता आणि भारतातील फोन उत्पादक कंपन्यांसाठी (ओईएमएस) जारी करण्यात आला होता. तेव्हापासून हे दोन्ही क्रमांक मोबाइल यूजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत, असं गुगलनं म्हटलं आहे. अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी झालेली नाही. हे क्रमांक मोबाइल फोनमधून काढून टाकता येऊ शकतात, असं गुगलनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी गुगलनं माफी मागितली आहे.

Post Bottom Ad