भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युती

Share This

मुंबई - प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम या दोन्ही राजकीय पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीची घोषणा गांधी जयंती दिनी येत्या २ ऑक्टोबर रोजी एका जाहीर सभेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी दिली.

भारिप आणि एमआयएम युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी बैठक झाली होती. दोन बैठकांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी औरंगाबाद येथील जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली जाहीर सभा होणार आहे. या नव्या समीकरणामुळे राज्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. युतीच्या निमित्ताने तब्बल तीस वर्षानंतर राज्यात पुन्हा एकदा दलित-मुस्लिम समाज राजकीयदृष्ट्या एकत्र येत आहे. यापूर्वी पिपल्स रिपब्लिकनचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी हाजी मस्तान यांच्याशी युती केली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages